Posts

Showing posts from March, 2022

शेळी पालन म्हणजे "Any Time Money"

Image
शेळी पालन म्हणजे "Any Time Money" उत्कर्ष लर्निंग सेंटर कृषि विज्ञान केंद्र,सगरोळी येथे नाबार्ड अंतर्गत शास्ञोक्त शेळीपालन प्रशिक्षण संपन्न. वातावरण बदलाचे कृषी क्षेत्रावर होणारे अनिष्ट परिणाम लक्षात घेऊन ग्रामीण भागातील युवकांनी शेती पूरक व्यवसायाकडे वळावे तसेच जे तरुण या क्षेत्रात सध्या कार्यरत आहेत त्यांनी अद्ययावत तंत्रज्ञानाचा अवलंब करून आपला व्यवसाय वृद्धिंगत करावा या साठी नाबार्ड च्या साहाय्याने उत्कर्ष लर्निंग सेंटर कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी येथे शास्त्रोक्त शेळी पालन प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रशिक्षणाचे उदघाटन प्रसंगी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ , नागपूर चे संचालक, कृषि विस्तार प्रा.डॉ. अनिल भिकाने यांनी शास्त्रोक्त शेळीपालना तील चतुःसूत्री बद्दल शेतकऱ्यांशी संवाद साधला तर नाबार्ड चे जिल्हा विकास व्यवस्थापाक श्री राजेश धुर्वे यांनी शेळीपालन प्रशिक्षणाचे महत्व विशद करून विपणन व्यवस्थापन व बँकेच्या बाबतीत शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी विषयी शेतकऱ्यांना माहिती दिली. विशेष अतिथी व प्रमुख मार्गदर्शक म्हणून पशुवैद्यकीय महाविद्याल...

रसायन मुक्त होळी - काळाची गरज ....

Image
रसायन मुक्त होळी - काळाची गरज .. होळी/ रंगपंचमी साजरी करताना वापरात येणाऱ्या रंगांमध्ये हानीकारक रसायने असतात. ज्यामुळे त्वचा खराब होवुन नाक, कान, घसा व डोळ्यांना देखील हानी होते. अशी रसायनयुक्त रंग वापरल्यामुळे आरोग्य तर धोक्यात येतेच त्यासोबत हे रंग काढण्यासाठी पाण्याचा देखील अती वापर होतो. हे सर्व दुष्परिणाम टाळण्यासाठी आणि होळी आणि रंगपंचमी सारखा आनंदाचा सन आणखी आनंदी करण्यासाठी होळीचे नैसर्गिक , रसायांमुक्त रंग अतिशय फायद्याचे ठरतात. हे नैसर्गिक रंग तयार करून महिला छोटा गृह उद्योग देखील सुरू करू शकतात. याच उद्देशाने कृषी विज्ञान केंद्र, सागरोळी तर्फे आज दि. 20/1/2022 रोजी नैसर्गिक रंग तयार करण्याचे प्रशिक्षण कोकलेगाव ता. नायगाव येथील महिलांना देण्यात आले. या रंगांचे महत्त्व सांगून बनवण्याची पद्धत सविस्तर करून दाखविण्यात आली. कोकलेगाव येथील महिला या वर्षीच्या रंगपंचमीसाठी हे नैसर्गिक रंग तयार करून बाजारात आणणार आहेत. #color #colourful #coloring #colorful #colors_of_day #holi #holistic #holicelebration #holipowder #holifestival #holifestivalindia #chemicalfree #chemical...

कौशल्य विकास कार्यक्रम व राष्ट्रीय तेलबिया पिके अभियान अंतर्गत "उन्हाळी भुईमूग लागवड घुगे पॅटर्न " पेरणीपूर्व प्रशिक्षण व प्रात्यक्षिकातिल शेतकऱ्यांना निविष्ठा पुरवठा

Image
कौशल्य विकास कार्यक्रम व राष्ट्रीय तेलबिया पिके अभियान अंतर्गत "उन्हाळी भुईमूग लागवड घुगे पॅटर्न " पेरणीपूर्व प्रशिक्षण व प्रात्यक्षिकातिल शेतकऱ्यांना निविष्ठा पुरवठा संस्कृती संवर्धन मंडळ कृषी विज्ञान केंद्र सगरोळी जि नांदेड कडून राष्ट्रीय तेलबिया पिके अभियान 2021-22 अंतर्गत मौजे अंबुलगा तालुका मुखेड येथे "समूह प्रथमदर्शनी प्रात्यक्षिक" उन्हाळी भुईमूग राबविण्यात येत आहे. हे प्रात्यक्षिक कृषिभूषण श्री मधुकर घुगे केहाळ तालुका जिंतूर विकसित" घुगे पॅटर्न "वर आधारित आहे. मागील तीन वर्षापासून उन्हाळी भुईमूग प्रात्यक्षिकांमध्ये घुगे पॅटर्नचा अवलंब केल्यामुळे मोठ्या प्रमाणात उत्पादकतेमध्ये वाढ दिसून आली त्यामुळे या हंगामामध्ये मुखेड तालुक्यातील मौजे अंबुलगा येथील 25 शेतकऱ्यांची 10 हेक् ‍ टर प्रात्यक्षिकासाठी निवड करण्यात आली व त्यांना पेरणीपूर्व प्रशिक्षण व निविष्ठा पुरवठा( सुधारित वाण टॅग 37, ट्रायकोडर्मा, एनपीके व फॉस्फो जिप्सम ,जमीन आरोग्य पत्रिका, घुगे पॅटर्न माहितीपुस्तिका) करण्यात आला .कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ प्रा. कपिल इंगळे व श्री तुकाराम मंत्रे...

उन्हाळी सोयाबीन बीजोत्पादनाकडे शेतकऱ्यांचा कल.....

Image
  उन्हाळी सोयाबीन बीजोत्पादनाकडे शेतकऱ्यांचा कल..... संस्कृती संवर्धन मंडळ कृषी विज्ञान केंद्र सगरोळी जि. नांदेड येथे" उन्हाळी सोयाबीन बीजोत्पादन " याविषयी एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. या प्रशिक्षण कार्यक्रमात बिलोली तालुक्यातील बेळकोणी बुद्रुक, बेळकोणी खुर्द, तळणी, बावलगाव, आरळी व कुंभारगाव येथील 40 पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला. प्रशिक्षणानंतर बेळकोणी बुद्रुक येथील 15 शेतकऱ्यांना सोयाबीनचे विविध वाण ज्यात फुले संगम, फुले किमया व एम.ए.यु.एस -612 इत्यादी वाण उन्हाळी सोयाबीन स्वीकार्य चाचणी प्रयोगासाठी देण्यात आले. प्रशिक्षणात उन्हाळी सोयाबीन बीज उत्पादनाबद्दल सविस्तर माहिती ज्यात लागवड कालावधी, वाणाची निवड, बीज प्रक्रिया, लागवड पद्धत, पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन, भेसळ काढणे, काढणी, मळणी व साठवणूक करताना घ्यावयाची काळजी इत्यादी बाबी बद्दल कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ प्रा .कपिल इंगळे यांनी सविस्तर माहिती दिली. प्रशिक्षणानंतर कृषी विज्ञान केंद्रा वरील उन्हाळी सोयाबीन बीजोत्पादन प्रक्षेत्र भेट देण्यात आली व बीजोत्...